पुणे शहरात मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. सिंहगड रस्त्यावरील आनंद नगर परिसरातील एकता नगर येथे ओढ्याचे बॅकवॉटर शिरल्याने अनेक सोसायटीमध्ये पाणी घुसले. अचानक आलेल्या या पाण्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिस्थिती हाताळण्यासाठी पुणे महानगरपालिका आणि अग्निशमन दलाने तातडीने कारवाई सुरू केली आहे. दरम्यान, खडकवासला धरणातून मुठा नदीत विसर्ग वाढवण्यात आल्याने पाणीपातळी झपाट्याने वाढली असून, त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.