Pune Car Accident : पुणे हिट अँड रन प्रकरण आरोपीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असते तर? कायदा काय सांगतो?

पुण्यातील कल्याणीनगरमध्ये मध्यरात्री मद्यपान करून आलिशान पोर्श कारने धडक देऊन पुण्याीतल प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने दोघांना चिरडल्याची घटला घडली. या अपघातात दोन आयटी इंजिनीअर असलेल्या अश्विनी कोस्टा आणि अनिस अवधिया या तरुण तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणातील व्यावसायिकाचा आरोपी मुलगा अवघ्या १७ वर्षांचा आहे . या आरोपी तरुणाने घटनेपूर्वी मद्यपान केले होते त्याचा पबमधला सीसीटीव्ही आणि त्यानंतर भरधाव मोटार चालवत धडक दिल्याचे आणखी सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पण या गंभीर घटनेनंतरही आरोपी तरुणाला १५ तासांच्या आत जामीनही मंजूर करण्यात आला. अगदी किरकोळ कलमे लावून आरोपीला जामीन देण्यात आला. त्यामुळे पुणे पोलीस प्रशासाच्या कारभारावर संताप व्यक्त करत प्रश्न उपस्थित केले गेले. मुलगा अल्पवयीन असल्याचा मुद्दा यावेळी पुढे केला जातो. पण या घटनेत आरोपीचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असते तर? कायदा काय सांगतो? जाणून घेऊ व्हिडीओच्या माध्यमातून...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com