Pune News: तरुणावर कोयत्याने सपासप वार, सगळे बघत राहिले, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतला प्रकार | Sakal News

Pune News: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत थरारक घटना; पाठलाग करून तरुणावर कोयत्याने सपासप वार, जीव वाचवण्यासाठी पाया पडूनही हल्ला सुरूच, ३० पेक्षा अधिक टाके पडलेला आदित्य कांबळे गंभीर जखमी, संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद..

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. एका तरुणाचा पाठलाग करत त्याच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून हा संपूर्ण हल्ला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. ही घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. हल्लेखोरांनी आदित्य सुनिल कांबळे या तरुणाचा रस्त्यात पाठलाग केला आणि लाकूड तोडताना जसे घाव घातले जातात, तशाच निर्दयपणे त्याच्यावर कोयत्याने वार केले. जीव वाचवण्यासाठी आदित्य हल्लेखोरांच्या पाया पडत गयावया करत होता, मात्र तरीही हल्ला थांबवण्यात आला नाही. घटनास्थळी मोठी बघ्यांची गर्दी जमली होती, पण कोणीही पुढे येऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. या भीषण मारहाणीत आदित्य गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्यात ३० पेक्षा अधिक टाके पडले आहेत. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींविरोधात मैत्रिणीकडून तक्रार देण्यास भाग पाडल्याच्या कारणातून आदित्यवर हा खुनी हल्ला करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस पुढील तपास करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com