PMC Mayor News: ..म्हणून Manjusha Tilekar यांना पुण्याचं महापौरपद दिलं | Pune Mahapalika | Sakal News
पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने एकहाती सत्ता मिळवत तब्बल ११९ नगरसेवक निवडून आणले. या विजयाच्या पार्श्वभूमीवर महापौर आणि उपमहापौर पदासाठीची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये मंजुषा दीपक नागपुरे यांची पुणे महापौरपदी तर परशुराम वाडेकर यांची उपमहापौरपदी निवड करण्यात आली. मात्र, महापौर पदाच्या निवडीदरम्यान भाजपमध्येच अंतर्गत मतभेद उफाळून आल्याची चर्चा रंगली. महापौर पदासाठी काही इतर नावांचीही जोरदार चर्चा होती, मात्र अखेर पक्ष नेतृत्वाने मंजुषा नागपुरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या संघटन कौशल्य, पक्षातील सक्रिय कामगिरी आणि स्थानिक स्तरावरील मजबूत संपर्क यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, चर्चेत असलेल्या इतर इच्छुकांना संधी न मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पुणे महानगरपालिकेत भाजपच्या नव्या नेतृत्वाकडे आता शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
