Raj Thackeray ना छोटं वाटणाऱ्या सहकार खात्याचा इतिहास लय मोठा आहे! | Ministry of Cooperation | Sakal News
आपण सुरुवातीला राज ठाकरेंचा व्हिडिओ पाहिला. त्यात ते बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीविषयी पत्रकारानं प्रश्न विचारला त्यावर प्रतिक्रिया देताना या छोट्या गोष्टी आहेत असं म्हणून पत्रकार परिषदेतून निघून गेले. पण आता याच पतपेढी निवडणुकीमुळे चर्चेत येणाऱ्या सहकाराच्या राजकारणाविषयी आपण बोलणार आहोत. कारण हे तेच खातं आहे ज्याची दखल अगदी आपल्या देशात मोदी अन् भाजपनंही घेतली अन् थेट वेगळं मंत्रालय स्थापन केलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर संयुक्त राष्ट्रानं २०२५ हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे आणि आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर याच सहकार क्षेत्रानं मोठी क्रांती घडवली आहे. सहकाराच्या बीजातून उगवलेला प्रगतशील महाराष्ट्र आपण आज पाहतोय. महाराष्ट्राच्या प्रगतीत सहकार क्षेत्रातील प्रत्येक संस्थेनं खारीचा वाटा उचलत मोठा हातभार लावला आहे. मग त्यात पतसंस्था म्हणजेच पतपेढ्यांचाही समावेशही आहेच. त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असलं तरी त्याचं महत्व नक्कीच कमी होत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.