Raksha Khadse: 'केंद्रीय मंत्र्याची मालमत्ता सुरक्षित नाही तर..' | Eknath Khadse | Jalgaon | Sakal News

Eknath Khadse News: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा पडला. त्यावरुन केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मालमत्ता सुरक्षित नाहीत इतरांचं काय? असा सवाल माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला..

जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. नुकताच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आला. या घटनेनंतर माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. खडसे म्हणाले, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मालमत्तेचीच सुरक्षितता राखली जात नसेल, तर सामान्य नागरिकांचं काय? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच, त्यांनी पुढे सांगितलं की, रक्षा खडसे यांच्या मुलीवर झालेल्या छेडछाडीच्या प्रकरणातील गुन्हेगार अजूनही पोलिसांच्या ताब्यात नाही. जळगाव जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे आणि प्रशासन हातावर हात धरून बसलं आहे, असा आरोप त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Maharashtra Fuel Crisis
Nashik anti corruption bureau trap case
Youth Dies by Gunshot in Bhadgaon Area
Minor Girl Assault Case Reported in Jalgaon
Marathi News Esakal
www.esakal.com