Rohit Pawar यांची आक्रमक भूमिका, 'परवानगी दिली नसली तरी बघावं..' | Satyacha Morcha | Thackeray Brothers | Sakal News

Rohit Pawar On Vote Chori: मतदार यादीतील घोळावरून ‘सत्याचा मोर्चा’; सरकारवर रोहित पवारांचा हल्लाबोल! ‘परवानगी न दिली तरी पाहू, जेलमध्ये किती जागा आहेत; पुढचं आंदोलन तिथेच होईल’ असा थेट इशारा..

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडी आणि मनसेच्या ‘सत्याचा मोर्चा’दरम्यान राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मतदार याद्यांमधील गैरव्यवहार आणि मतदार चोरीच्या आरोपांवरून हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात बोलताना रोहित पवार म्हणाले, “आज आमच्या मोर्चाला परवानगी नसेल, पण सरकारने जेलमध्ये किती जागा आहेत ते आधी पाहावं. यानंतर जेल भरो आंदोलन जेलच्या बाहेरच होईल.” लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया देत मनसेसोबतच्या समन्वयाबाबतही संकेत दिले. डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “एसआयटी म्हणजे विषय कपाटात टाकल्यासारखं आहे,” असा आरोप करत त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com