Chhatrapati Sambhajinagar Rada: MIM ला विरोध, Imtiyaz Jaleel ना लोकांनी घेरलं | Sakal News

Chhatrapati Sambhajinagar Rada: छ. संभाजीनगरमधील बायजीपुरा परिसरात तुफान राडा, माजी खासदार इम्तियाज जलीलांच्या गाडीवर हल्ला; तिकीट नाकारल्याच्या रागातून MIMमधील नाराज-बंडखोर कार्यकर्त्यांचा संताप, पोलिसांचा सौम्य लाठीमार, काँग्रेस-पुरस्कृत उमेदवाराच्या पाठबळाचा जलीलांचा आरोप..

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय तणावाचा तुफान राडा पाहायला मिळाला आहे. बायजीपुरा परिसरात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामागे एमआयएम पक्षातील नाराज आणि बंडखोर कार्यकर्तेच असल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. पक्षासाठी गेली १० ते १२ वर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने संताप उसळला, आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com