सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर येताना दिसत आहेत. मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानावरून त्यांना सूचक टोला लगावला आहे. ‘झालं तर आमच्यामुळे आणि नाही झालं तर बाबांमुळे, हे असं कसं चालेल?’ असा सवाल शिवेंद्रराजेंनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आपण माघार घेतली होती. महायुती म्हणून निवडणूक लढवण्याच्या सूचना होत्या आणि आपण त्या वरिष्ठांपर्यंत तसेच घटक पक्षांपर्यंत पोहोचवल्या होत्या, असंही त्यांनी स्पष्ट केलं. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांविरोधात कुरघोड्या झाल्याचा आरोपही शिवेंद्रराजेंनी केला. तसंच, राजकीय हेवेदावे करण्यासाठी बँकेसारख्या सहकारी संस्थेचा वापर करू नये, असं मत त्यांनी व्यक्त केलं. जयकुमार गोरे आणि शिवेंद्रराजे यांच्यात नेमका वाद काय? महायुतीत पडद्यामागे काय घडलं? शिवेंद्रराजेंनी काय म्हटलं? पाहा संपूर्ण व्हिडिओ....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.