Satara News: Shambhuraj Desai vs Jaikumar Gore यांच्यात जुंपली | Sakal News

Shambhuraj Desai vs Jaikumar Gore: साताऱ्यात ‘दहशत’ आणि ‘नाद’ या शब्दांवरून महायुतीतील दोन मंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्ध; फलटणच्या सभेनंतर जयकुमार गोरे यांचा इशारा, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे जोरदार प्रत्युत्तर..

साताऱ्यात महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये दहशत आणि नाद या वाक्यावरून चांगलीच जुंपली आहे. फलटण येथे झालेल्या भाजपच्या विजयी सभेत मंत्री जयकुमार गोरे यांनी दाढीवर हात फिरवत कोणतरी फलटण मध्ये आलं आणि शिवसेना दहशत खपवून घेणार नाही असं म्हणाले त्यांना मला सांगायचे आहे दहशत आम्हाला पण चालत नाही आणि मला पण दाढी आहे असं सांगत आमच्या नादाला लागायचे नाही असा इशारा दिला होता. ज्यांनी ज्यांनी माझा नाद केला त्यांना मी सोडत नाही अशी नाव न घेता टीका मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली होती. या टीकेला मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील उत्तर देत माझा नाद करायचा नाही असं जयकुमार गोरे म्हणतायत याचाच अर्थ दहशत कोणाची आहे हे समजून जावं आणि मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही.निवडणुका असो नसो मोकळ्या वातावरणामध्ये सगळ्यांनी काम केलं पाहिजे.नाद नाही करायचा असे गोरे मंत्री म्हणत असतील तर अप्रत्यक्ष त्यांनी मान्य केले आहे की दहशत त्यांची आहे.दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेणार नाही. त्यामुळे इथून पुढे दादागिरी, दमदाटी, दहशतीची भाषा केली तर त्याला जशाच तसे उत्तर दिलं जाईल अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी गोरे यांना उत्तर दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com