Sharad Pawar सोबत Ajit Pawar यांच्या दोन्ही मुलांची बंद दाराआड चर्चा | Parth | Jay Pawar | Baramati | Sakal News

Sharad Pawar Meets Parth-Jay Pawar: विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची महत्त्वपूर्ण बैठक; अजित पवारांच्या जागी विश्वस्त नियुक्ती, स्मारक आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरही चर्चा सुरू..

विद्या प्रतिष्ठानमध्ये सध्या महत्त्वाची बैठक सुरू असून या बैठकीत शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार सहभागी झाले आहेत. पवार कुटुंबीयांसह विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांमध्ये ही चर्चा सुरू आहे. शरद पवार हे विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष असून दिवंगत अजित पवार हे विश्वस्त होते. या बैठकीत अजित पवारांच्या जागी विश्वस्त म्हणून पार्थ पवार किंवा जय पवार यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता चर्चेत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यासोबतच अजित पवारांच्या स्मारकाबाबतही या बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र येण्याबाबतही राजकीय पातळीवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, येणाऱ्या काळात महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com