रशियाच्या सायबेरिया भागातील इरकुत्स्क शहरात एका प्रयोगशाळा महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर जगभरात न्यूमोनिक प्लेगची (Pneumonic Plague) दहशत पसरली आहे. मृत महिलेच्या संपर्कात आलेल्या तब्बल १९७ जणांना प्रशासनाने तातडीने क्वारंटाईन करून वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवले आहे. जरी या महिलेचा मृत्यू प्लेगमुळेच झाला आहे याची अधिकृत पुष्टी रशियन आरोग्य यंत्रणांनी अद्याप केलेली नसली, तरी या घटनेने कोरोना महामारीच्या काळातील भयंकर आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत. हवा, श्वसन आणि संपर्काद्वारे वेगाने पसरणाऱ्या या संसर्गजन्य आजारामुळे पुन्हा जगभरात नवीन साथीचा धोका निर्माण झाला आहे का आणि पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती उद्भवू शकते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोग्य तज्ज्ञ या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.