सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर विमानसेवा सुरू! २ वर्षांनंतर पहिलं विमान दाखल | Sindhudurg Airport

Chipi Airport: नवी मुंबईवरून टेकऑफ घेतलेलं फ्लाय-९१ कंपनीचं विमान प्रवाशांना घेऊन आज सिंधुदुर्गच्या चिपी विमानतळावर दाखल झालं. या पहिल्याच विमानातून सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनीही प्रवास केला.

Sindhudurg Airport: नवी मुंबईवरून टेकऑफ घेतलेलं फ्लाय-९१ कंपनीचं विमानाचं चिपी विमानतळावर आगमन होताच सिंधुदुर्गवासीयांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केलं. विशेष म्हणजे, आता आठवड्याचे सातही दिवस ही विमानसेवा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे कोकणवासीयांसह सिंधुदुर्गमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. या विमानसेवेमुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन आणि उद्योग क्षेत्रालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...