Jayakumar Gore On MLA Abhijit Patil यांना इशारा | Devendra Fadnavis | Sakal Media

Solapur जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे‌. याच दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांना इशारा दिला.

सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या रणधुमाळीत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजीत पाटील यांना जाहीर इशारा दिला आहे. 'नाद कुणाचा ही करा, पण देवा भाऊंच्या नाद करू नका,' असा थेट इशारा जयकुमार गोरे यांनी दिला. याचवेळी त्यांनी, 'भाजप संपवणारा अजून जन्माला यायचाय. आपल्या क्षमतेनुसार आणि कुवतीप्रमाणेच बोलावं,' असा टोला आमदार अभिजीत पाटील यांना लगावला. भाजपविरोधात केलेल्या वक्तव्यांवरून आमदार पाटील यांनी भान ठेवावं, असा सल्ला देत गोरे म्हणाले की, 'भाजपने जर छत काढलं तर काय होईल, याचाही विचार पाटील यांनी करावा.' पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटलं असून, जिल्हा परिषद निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

Satara District Bank chairman election 2026
Jaykumar Gore statement on Satara District Bank election
Jaykumar Gore BJP claim on Satara District Bank
Jaykumar Gore Solapur District Bank