Abhijit Dipake : शिक्षकांचा अभाव, रस्ताही नाही! | व्हिडिओ शेअर करत मांडली विद्यार्थ्यांची व्यथा

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी करावा लागतो जीवघेणा प्रवास; अभिजित दिपके यांनी व्हिडिओद्वारे मांडली ग्रामीण वास्तवाची करुण कहाणी

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात शिक्षण व्यवस्थेचे अत्यंत विदारक आणि भीषण चित्र समोर आले आहे. कोसा आलेंगा गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी दररोज ३ किलोमीटर जंगलातील धोकादायक पायवाटेने प्रवास करून कोहका येथील शाळेत जावे लागत आहे. या जंगलाच्या मार्गावर वन्यप्राण्यांचा आणि मुख्यत्वे वाघाचा वावर असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनात कायम भीतीचे सावट असते. दुसरीकडे, स्थानिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची तीव्र कमतरता असल्याने शाळा बंद पडल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी प्रत्यक्ष कोहका व परिसरातील शाळांना भेट देऊन पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न, पायाभूत सुविधांचा अभाव आणि प्रशासनाच्या दिरंगाईवर त्यांनी कडक शब्दांत नाराजी व्यक्त करत थेट सवाल उपस्थित केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com