Sukhbir Badal attack : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादलांवर हल्ला; गुरुद्वारा परिसरात खळबळ

माता साहेब गुरुद्वारात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल जखमी; संशयित ताब्यात, हल्ल्यामागील उद्देशाचा तपास सुरू.

नांदेडमधील माता साहेब गुरुद्वारा परिसरात पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुद्वारा परिसरात घडलेल्या या घटनेत सुखबीर सिंह बादल यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी नांदेडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयिताला ताब्यात घेतले असून हल्ल्यामागील नेमका उद्देश काय होता, याचा तपास सुरू आहे. या घटनेमुळे गुरुद्वारा परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. सुखबीर सिंह बादल यांच्यावर नेमका कसा हल्ला झाला, हल्लेखोर कोण आहे आणि या घटनेमागे कोणतं कारण आहे, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. या घटनेशी संबंधित पुढील माहिती आणि पोलिस तपासातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ बघा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com