नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 'इंडिया' (INDIA) आघाडीचे खासदार रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर जोरदार निशाणा साधला. लोकशाही मार्गाने शांततेत काढण्यात येत असलेला मोर्चा दिल्ली पोलिसांनी अडवल्याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. "आम्ही देशातील लोकशाही आणि मतदारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहोत, परंतु पोलीस बळाचा वापर करून विरोधी पक्षांचे खासदार आणि लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा थेट आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच, मतदार याद्यांमधील कथित गडबड आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) ५० टक्के मोजणीसह निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागण्यांवर त्या ठाम राहिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.