Varangaon Nagarparishad: माजी नगराध्यक्ष Sunil Kale भडकले, Eknath Khadseवर संतापले | Raksha Khadse | Sakal News

Varangaon Local Body Election: 'वरणगाव नगरपरिषद निवडणूक तापली! भाजपा ने उमेदवारी नाकारल्यानंतर माजी नगराध्यक्ष सुनील काळेंचा बंडाचा झंझावात, अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करत पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांवर थेट आरोपांचा भडिमार'

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात वरणगाव नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मतदानाची तारीख जवळ येताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी नगराध्यक्ष आणि भाजप नेते सुनील काळे यांच्याभोवती सध्या राजकीय वादाचे केंद्र तयार झाले आहे. गेल्या पंचवार्षिकात सुनील काळे यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि नगराध्यक्ष पद पटकावले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी रक्षा खडसेंच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे यावेळी भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं. पक्षाने वरणगावातील दुसऱ्या गटाला उमेदवारी दिल्यानंतर काळे संतप्त झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com