Varsha Turkar Case : वर्षा तुरकरची हत्या कोणी केली? हत्येमागील कारणाचा शोध सुरू

दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या पुण्यात नोकरी करणाऱ्या ३५ वर्षीय वर्षा तुरकर यांची गोंदिया जिल्ह्यातील वैनगंगा नदीकाठच्या जंगलात हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी माहेरी आलेल्या वर्षा तुरकर या ३५ वर्षीय महिलेची गोंदिया जिल्ह्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात नोकरी करणारी वर्षा आपल्या तीन वर्षांच्या चिमुरडीला आजी-आजोबांकडे सोडून पुन्हा पुण्याला परतण्याच्या तयारीत होती. मात्र, वैनगंगा नदीच्या काठावर देवस्थानाजवळील जंगलात तिचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला. तिच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. घटनेच्या वेळी वर्षासोबत असलेला तिचा मित्र नितेश अग्रवाल याने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर या प्रकरणातील तपासाला वेगळी दिशा मिळाली आहे. वर्षाची हत्या नेमकी कोणी केली? हत्येमागे काय कारण होते? घटनेच्या दिवशी नेमके काय घडले होते? या सर्व प्रश्नांचा सविस्तर आढावा या बातमीतून घेणार आहोत. या हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...