उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपनेते सचिन घायाळ यांच्याकडून शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमध्ये घडली आहे. उसाच्या थकबाकीची मागणी करण्यासाठी घरी आलेल्या राहुल कांबळे या शेतकऱ्याला मारहाण झाली आहे. त्या शेतकऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. श्री संत एकनाथ सचिन घायाळ शुगर लिमिटेड कारखान्याला राहुल कांबळेंनी मागील गळीत हंगामात ऊस दिलेला काही पेमेंट मिळाले, उर्वरित पेमेंटसाठी देण्यासाठी 4 महिन्यांपासून टाळाटाळ सुरु होती. यानंतर कांबळेंना घायाळ यांनी पेमेंट घेण्यासाठी रविवारी सकाळी घरी बोलावले. 'तुला डेट पेमेंट देत नाही, काय करायचे ते कर' म्हणत काठ्यांनी-लाथाबुक्क्यांनी मारहाण याप्रकरणी सचिन घायाळ अमोल घायाळ, सुनील घायाळ, रवींद्र थोटे या चौघांवर गुन्हा दाखल मारहाण केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.