कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहात गळफास लावून आत्महत्या केली. टॉवेलच्या सहाय्याने त्याने स्वतःचे जीवन संपवले, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या प्रकरणानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि डीसीपी अतुल झेंडे यांच्यासह सरकारचे आभार मानले. त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, आम्हाला न्याय मिळाला आहे, आरोपीला त्याच्या कृत्यांची शिक्षा मिळाली. यासोबतच, पीडित मुलीच्या वडिलांनी आणखी एक मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, विशाल गवळीचे दोन भाऊ सध्या तडीपार आहेत आणि परिसरात दहशत निर्माण करतात. त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.