भारतीय संघाची कर्णधार म्हणून स्मृती मानधनाचीच निवड का?

Smriti Mandhana To Lead Team India : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदासाठी स्मृती मानधनाचीच निवड का करण्यात आली? सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओतून

हरमनप्रीत कौरने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदाची माळ स्मृती मानधनाच्या गळ्यात पडली. त्यामुळे आता भारतीय महिला क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. ११ हजारांहून अधिक धावा, १८ शतके आणि २ वूमन्स प्रीमियर लीग ट्रॉफींचा अनुभव असलेल्या स्मृतीला ही जबाबदारी देण्याचा निर्णय आश्चर्यचकीत करणारा नाही. तिचं नाव गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होतं. पण तरी तिच्यासमोर आता मोठी आव्हानं आहेत. आगामी काळात टी२० वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, ऑलिम्पिक, अशा मोठ्या स्पर्धा भारताला खेळायच्या आहेत. त्यामुळे स्मृतीसमोर आता भारतीय संघाला आणखी मोठ्या यशाकडे नेण्याचं आव्हान आहे. दरम्यान कर्णधारपदासाठी स्मृती मानधनाचीच निवड का करण्यात आली? गेल्या काही महिन्यांपासून तिच्या नावाची चर्चा का सुरू होती? तिच्याकडे कर्णधार म्हणून किती अनुभव आहे? सविस्तर जाणून घ्या या व्हिडिओतून.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com