
अमृता फडणवीस यांनी मनसेच्या प्रचारासाठी गाणे गायिले असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिल्यास लक्षात येते की हा व्हिडिओ फेक असून मूळ व्हिडिओसोबत छेडछाड करून हा व्हिडिओ बनविण्यात आला आहे.
पुणे : अमृता फडणवीस यांनी मनसेच्या प्रचारासाठी गाणे गायिले असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण या व्हिडिओची सत्यता पडताळून पाहिल्यास लक्षात येते की हा व्हिडिओ फेक असून मूळ व्हिडिओसोबत छेडछाड करून हा व्हिडिओ बनविण्यात आला आहे.
अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांसाठी आयोजित चॅरिटी कार्यक्रम उमंग 2018 मध्ये 'फिर से' हे गाणे सादर केले होते. या सादरीकरणाच्या व्हिडियोला एडिट करून त्यामध्ये मनसेचे गाणे टाकण्यात आले आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते.
Fact Crescendo Marathi या फेसबुक पेजवरील व्हिडिओच्या माध्यमातून सत्य समोर येत आहे.