
सध्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या समाजमाध्यमांवर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये असा दावा करण्यात येतो की, “१ मार्च २०२० नंतर ज्यांचे एक किंवा दोन्ही पालक मरण पावले आहेत आणि संबंधित बालकांचे वय १८ वर्षांखालील आहे, अशा कुटुंबांतील दोन मुलांना दरमहा ४ हजार रुपये दिले जातील.” ही मदत बालसेवा योजना अंतर्गत दिली जात असल्याचा उल्लेखही यात करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक नागरिक या मेसेजमुळे गोंधळात पडले आहेत. मात्र, हा मेसेज खोटा असून अशा कोणतीही योजना महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात नाही, मात्र ही योजना मध्यप्रदेश राज्यात सुरू आहे.