Created By : BOOM
Translated By: Sakal Digital Team
दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि आम आदमी पक्ष (आप) यांनी एकमेकांवर निशाणा साधत ‘पंचायत’ वेबसीरिजच्या दोन डीपफेक व्हिडिओंचा वापर केला आहे.
भाजपाच्या दिल्ली एक्स अकाउंटवरून ‘देख रहा है बिनोद? या लोकप्रिय सीनचा एडिट केलेला व्हिडिओ शेअर केला गेला. या व्हिडिओमध्ये ‘बनराकस’ आणि ‘विनोद’ या पात्रांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते दुर्गेश कुमार आणि अशोक पाठक यांच्या आवाजाची क्लोनिंग करण्यात आली आहे.
एका मिनिटाच्या या डीपफेक व्हिडिओमध्ये दुर्गेश कुमार असे आरोप करताना दिसतात की, आम आदमी पक्षाच्या ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजना’ आणि ‘संजीवनी योजना’साठी नोंदणीच्या नावाखाली लोकांची खाजगी माहिती गोळा केली जात आहे.
या व्हिडिओत पुढे वित्तीय फसवणूक टाळण्यासाठी कोणालाही वैयक्तिक माहिती शेअर करणे अनिवार्य नाही. या योजनांमध्ये नोंदणी करू नका, असे आवाहन करण्यात आले आहे.
या व्हिडिओमध्ये आम आदमी पक्षाच्या योजना आणि नोंदणी प्रक्रियेवर उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी दैनिक जागरणमध्ये छापून आलेल्या बातमीचा स्क्रिनशॉट देखील वापरण्यात आला आहे.