

Created By : Vishwas News
Translated By: Sakal Digital Team
नवी दिल्ली: शपथविधीनंतर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत आणि या समारंभाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, ज्याबद्दल असा दावा केला जात आहे की या कार्यक्रमादरम्यान भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पुढील रांगेतून उठवून मागच्या रांगेत बसण्याच सांगितले.
विश्वास न्यूजला त्यांच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे आढळून आले. व्हायरल झालेला व्हिडिओ क्लिप डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत शपथविधी सोहळ्याचा भाग आहे, परंतु त्यातील ज्या व्यक्तीला पुढच्या रांगेतून मागे येण्यास सांगितले जाते ती भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर नसून एक महिला छायाचित्रकार होती.