Created By : Vishwas News
Translated By: Sakal Digital Team
नवी दिल्ली: सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करून दावा केला जात आहे की हा 26 जानेवारी रोजी लाल किल्ल्यावर झालेल्या परेड दरम्यानचा आहे.
विश्वास न्यूजच्या पडताळणीत आढळले की हा दावा चुकीचा आहे. हा फोटो आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) द्वारे तयार करण्यात आला आहे.