Bangladesh Riots : पंतप्रधान शेख हसीना ( Sheikh Hasina) यांनी सोमवारी पदाचा राजीनामा दिला आणि तातडीने देश सोडले. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेले आंदोलनाने उग्र रुप धारण केले आहे आणि आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या गोळीबार आणि रबराच्या गोळ्या झाडल्या. लष्करप्रमुख जनरल वाकर-उझ-झमान यांनी हसिना यांच्या राजीनाम्यानंतर अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणा केली. सततच्या निषेधांमुळे अल्पसंख्याकांवरील संभाव्य हिंसाचाराबद्दल चिंता वाढली आहे.
संपूर्ण बांगलादेशात हिंसक निदर्शने आणि जाळपोळ सुरू आहे आणि हिंदू घरे व मंदिरे जाळल्याबद्दलचे कथित ट्विट सोशल मीडियावर फिरू लागले आहेत. काही ट्विटमध्ये नेटिझन्सनी बांगलादेश क्रिकेट संघाचा खेळाडू लिटन दासचे घर निदर्शकांनी जाळल्याचा दावा केला आहे. लिटन दास हिंदू असल्याने त्याचे घर जाळल्याचे नेटिझन्स म्हणत आहेत. पण, ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे. बंगाली हिंदू असलेल्या दासने अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशचे प्रतिनिधित्व केले आहे.
जे घर पेटलेले दाखवले जात आहे, ते माजी कर्णधार मश्रफी मुर्ताझा याचे आहे. मुर्तझा हा हसीना यांच्या अवामी लीगचा खासदार आहे. आंदोलकांनी अवामी लीगच्या इतर नेत्यांच्या घरांनाही लक्ष्य केले.
काही युझर्सनी हे मुर्तझाचे घर असल्याचे म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.