Fact Check: बांगलादेशी धर्मगुरूचे जुने द्वेषपूर्ण भाषण भारतीय निवडणुकांशी संबंध जोडत होतेय व्हायरल

Bangladeshi cleric: व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, "मुफ्ती सलमान अझहरी अल्लामा डॉ. सय्यद इर्शाद बुखारी यांचे विले गुस्ताखे रसूल नरसिंहानंद सरस्वती यांना बांग्लादेशातून मुबाहिला चॅलेंज."
Bangladeshi cleric
Bangladeshi clericEsakal

Created By: Boom

Translated By : Sakal Digital Team

बांगलादेशातील एका मुस्लिम धर्मगुरूचे द्वेषयुक्त भाषण दर्शविणारा एक जुना व्हिडिओ सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीशी संबंधीत असल्याचे दाखवत व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओ कॅप्शनसह सोशल मीडियावर शेअर केला जात आहे ज्याचे हिंदीतून भाषांतर केले आहे, "जर काँग्रेस सत्तेवर आली तर ते घरोघरी जात आणि हिंदूंना इस्लाम स्वीकारण्याचे आमंत्रण देतील." 26 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हिंदूंविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसत आहे.

'एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Old hate speech by Bangladeshi cleric
Old hate speech by Bangladeshi clericEsakal

सत्य

या दाव्याबाबत सत्य तपासल्यानंतर BOOM ला आढळले की, व्हायरल व्हिडिओ 2021 चा आहे आणि तो बांगलादेशातील आहे. तो भारत किंवा काँग्रेस पक्षाशी संबंधित नाही आणि सोशल मीडियावर दिशाभूल करणारा दावा करत तो शेअर केला जात आहे.

बूमने व्हिडिओच्या कीफ्रेम्स Google वर रिव्हर्स इमेज सर्च केल्या. त्यावेळी सर्च रिझल्ट्समध्ये असे दिसून आले की, व्हिडिओ बांगलादेशातील असून तो 2021 चा आहे.

'डॉ. सय्यद इर्शाद अहमद अल बुखारी' या YouTube चॅनेलने 30 एप्रिल 2021 रोजी हा पूर्ण व्हिडिओ पोस्ट केला होता.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे, "मुफ्ती सलमान अझहरी अल्लामा डॉ. सय्यद इर्शाद बुखारी यांचे विले गुस्ताखे रसूल नरसिंहानंद सरस्वती यांना बांग्लादेशातून मुबाहिला चॅलेंज."

Bangladeshi cleric
Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

कॅप्शनमध्ये व्हिडिओमधील व्यक्ती डॉ. सय्यद इर्शाद बुखारी असल्याचे सांगितले आहे. 7 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये, आपण त्यांना हिंदुत्वादी नेते यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या प्रेषित मुहम्मदविरोधी विधानांचा निषेध करताना ऐकू शकतो.

1.35 मिनिटांच्या टाइमस्टॅम्प ते 7 मिनिटांच्या टाइमस्टॅम्पवर, व्हायरल व्हिडिओप्रमाणेच घटनांचा क्रम दिसतो.

या मूळ व्हिडिओमध्ये बुखारी नरसिंहानंद यांच्यावर टीका करतात आणि त्यांना इस्लाम स्वीकारण्याचे आव्हान देतात. खालील व्हिडिओमध्ये बुखारी भारत किंवा काँग्रेस पक्षाबद्दल बोलत नाहीत.

Bangladeshi cleric
Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

निष्कर्ष

सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्याबाबत सर्व तथ्थे तपासल्यानंतर असे लक्षात येते की, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा आणि काँग्रेस पक्षाचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे केला जात असलेला दावा खोटा आहे.

'बूम' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com