Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Kanhaiya Kumar: मूळ व्हिडिओमध्ये कन्हैय्या कुमार मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 1947 मध्ये जामा मशिदीत दिलेल्या भाषणाचा संदर्भ देत आहेत.
Fact Check|Kanhaiya Kumar
Fact Check|Kanhaiya KumarEsakal

Created By: न्यूज मीटर

Translated By : सकाळ डिजिटल टीम

ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांचा कथितपणे लोकांना इस्लामचा स्वीकार करण्याचा आग्रह करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओ शेअर करणाऱ्यांनी असाही दावा केला आहे की, काँग्रेस पक्षाने कुमार यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी दुसऱ्यांदा तिकीट दिले आहे.

“आपला इतिहास या भूमीशी जोडलेला आहे. आपण अरबातून इथे आलो नाही, आपण येथे मोठे झालो आहोत. अस्पृश्यतेविरुद्धच्या अनोख्या भूमिकेमुळे लोकांनी हा धर्म स्वीकारला आहे. तो शांतता आणि समानतेवर भर देतो. मशिदीमध्ये कोणतेही पदानुक्रम नसतात; यावर आधारित, आम्ही हा धर्म निवडला आहे आणि तो सोडणार नाही. आपण स्वतःचे रक्षण करू आणि असे करताना आपण आपल्या समाजाचे आणि देशाचे रक्षण करू. ते आपले मूलभूत कर्तव्य आहे. अल्लाहकडे अपार सामर्थ्य आणि आपले रक्षण करण्याची इच्छा आहे,” असे कन्हैया कुमार व्हिडिओमध्ये बोलताना ऐकू येते.

दावा

"कन्हैया कुमार मुस्लिमांना संबोधित करताना म्हणाला की, मी मुस्लिम झालो आहे, प्रत्येकाने मुस्लिम बनले पाहिजे... हिंदू धर्म व्यर्थ आहे. आता काही दुटप्पी हिंदू असतील जे काँग्रेस किंवा इंडिया आघाडीला मत देतील. काँग्रेसने त्यांना दोनदा लोकसभेचे तिकीट दिले आहे, तो हरला ही वेगळी बाब आहे,” असे व्हिडिओ शेअर करणाऱ्या एक्स युजरने लिहिले आहे.

एक्सवरील कन्हैय्या कुमार यांच्याबाबतची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
एक्सवरील कन्हैय्या कुमार यांच्याबाबतची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.Esakal

एका एक्स युजरने हा व्हिडिओ कॅप्शनसह शेअर केला आहे ज्यामध्ये म्हटले आहे की, “काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमारचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये तो हिंदू धर्माचा अवमान करताना आणि इस्लामची स्तुती करताना दिसत आहे."

'एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

कन्हैय्या कुमार यांच्याबाबत खोटा दावा करणारी एक्स पोस्ट.
कन्हैय्या कुमार यांच्याबाबत खोटा दावा करणारी एक्स पोस्ट.Esakal
Fact Check|Kanhaiya Kumar
Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

सत्य

दरम्यान न्यूजमीटर या संकेतस्थळाने याबाबत सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना आढळून आले की, व्हिडिओ वेगवेगळ्या टाइमस्टॅम्पवर क्लिपिंग आणि एडिट करून डिजिटल पद्धतीने हाताळला गेला आहे.

मूळ व्हिडिओमध्ये कन्हैय्या कुमार मौलाना अबुल कलाम आझाद यांनी 1947 मध्ये जामा मशिदीत दिलेल्या भाषणाचा संदर्भ देत आहेत.

व्हिडिओच्या कीफ्रेमच्या रिव्हर्स इमेज सर्च केल्यानंतर, मूळ व्हिडिओ YouTube वर वन चॅनलने २७ ऑगस्ट २०१८ रोजी प्रकाशित केलेला आढळला.

महाराष्ट्रातील नांदेड येथे ऑल इंडिया तंझीम-ए-इन्साफने आयोजित केलेल्या ‘डायलॉग विथ कन्हैय्या कुमार’ या कार्यक्रमात कुमार यांनी मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित लोकांच्या मेळाव्याला संबोधित करताना मुस्लिमांशी संबंधित समस्यांवर चर्चा केली होते.

Fact Check|Kanhaiya Kumar
Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

कन्हैय्या कुमार यांना काँग्रेसकडून दुसऱ्यांदा तिकिट?

जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी 2019 मध्ये बिहारच्या बेगुसरायमधून भारतीय जनता पक्षाचे नेते गिरिराज सिंह यांच्या विरुद्ध भारतीय कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय) उमेदवार म्हणून आपली पहिली लोकसभा निवडणूक लढवली होती.

2018 मध्ये जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला तेव्हा कुमार काँग्रेस पक्षाशी संबंधित नव्हते. 2021 मध्ये ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि आता काँग्रेस उमेदवार म्हणून त्यांची पहिली निवडणूक लढत आहेत.

निष्कर्ष

सर्व तथ्थे तपासल्यानंतर न्यूजमीटरने असा निष्कर्ष काढला की, वेगवेगळ्या टाइमस्टॅम्पच्या क्लिपिंग आणि एडिटिंग करून व्हिडिओमध्ये फेरफार करण्यात आला आहे. तसेत कन्हैया कुमारने लोकांना इस्लाम धर्म स्वीकारण्याचे आमंत्रण दिल्याचा दावा खोटा आहे.

2023 मध्येही कन्हैया कुमार यांच्या याच दाव्यासह व्हिडिओ व्हायरल झाला होता.त्यावेळीही NewsMeter ने तो व्हिडिओ खोटा असल्याचे सांगितले.

'न्यूजमीटर' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com