शाहरुख खान सध्या एका फोटोमुळे चर्चे आला आहे. व्हायर होत असलेल्या फोटोत किंग खान त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगा आर्यन खान सोबत मक्कामध्ये हज यात्रा करताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्यानतर गौरी खानने लग्नानंतर 34 वर्षांनी धर्मपरिवर्तन केल्याची चर्चा सुरु झाली आहे. फोटोनुसार शाहरुखच्या पत्नीने आता इस्लाम कबूल केला आहे. या फोटोचे आणि दाव्याचे सत्य काय आहे ते जाणून घेऊया.