Fact Check: लोकसभा निवडणूक निकालानंतर फ्री रिचार्जच्या नावाने फेक मेसेज व्हायरल

Free Recharge Message: व्हायरल होत असलेली लिंक फेक असून, सायबर तज्ञांनी या लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे.
Lok Sabha Election Free Recharge Fake News
Lok Sabha Election Free Recharge Fake NewsEsakal

Created By Vishwas News

Translated By Esakal

देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत. दरम्यान, निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधान झाल्याच्या आनंदात पंतप्रधान नरेंद्र मोदी संपूर्ण भारताला ७४९ रुपयांचे तीन महिने मोफत रिचार्ज देत असल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये तुम्हाला एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जात आहे.

दरम्यान विश्वास न्यूजने व्हायरल मेसेजची तथ्य तपासणी केल्यानंतर हा दावा खोटा निघाला. सध्या मोदी सरकारकडून अशी कोणतीही योजना राबविली जात नाही. व्हायरल होत असलेली लिंक बनावट असून, सायबर तज्ञांनी या लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे.

दावा

फेसबुक युजर मोहम्मद मुस्तमीरने 5 जून रोजी एक लिंक शेअर करताना लिहिले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 च्या निवडणुका जिंकून पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्याच्या आनंदात ते संपूर्ण भारताला 749 रुपयांचे चे 3 महिन्यांचे रिचार्ज पूर्णपणे मोफत देत आहेत. त्यामुळे आता रिचार्ज खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंकवर क्लिक करा आणि मोफत रिचार्ज मिळवा.

हा मेसेज विश्वास न्यूजच्या टिपलाइन क्रमांक +91 9599299372 वर देखील प्राप्त झाला आहे.

व्हायरल पोस्टचा मजकूर जसा आहे तसा इथे लिहिला आहे. अनेक युजर्स सोशल मीडियावर अशाच दाव्यासह हा मेसेज शेअर करत आहेत.

'फेसबुक'वरील (Facebook) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Lok Sabha Election Free Recharge Fake News
Fact Check: साहेब दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत...'पद्मश्री' पोस्टाने पाठवा; नाग हलधर यांच्याबाबतचा दावा खोटा

फ्री रिचार्जच्या नावाखाली व्हायरल झालेल्या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी विश्वास न्यूजने दिलेली लिंक स्कॅन केली. ती त्यांना संशयास्पद वाटली. ही लिंक भारत सरकार किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही विभागाची नव्हती. असे मेसेज यापूर्वीही अनेकदा व्हायरल झाले आहेत.

विश्वास न्यूजने अशा संदेशांबाबत सायबर सुरक्षा तज्ञ आणि राजस्थान सरकारच्या सार्वजनिक तक्रार समितीचे माजी आयटी सल्लागार आयुष भारद्वाज यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की अशा लिंकवर चुकूनही क्लिक करू नये. लिंकवर क्लिक केल्यास फसवणूक होऊ शकते.

या व्हायरल मेसेजबाबत विश्वास न्यूजने सायबर तज्ज्ञ चातक वाजपेयी यांच्याशीही चर्चा केली. हा एक प्रकारचा घोटाळा असल्याचे त्यांनी सांगितले. असे कोणतेही ॲप चुकूनही डाऊनलोड करू नये. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती चुकीच्या हातात पडू शकते.

Lok Sabha Election Free Recharge Fake News
Fact Check: शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा नितेश राणे यांचा दावा, वाचा काय आहे सत्य

निष्कर्ष: मोफत रिचार्ज योजनेच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट खोटी आहे. सायबर तज्ञांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक न करण्याचा सल्ला दिला आहे.

'विश्वास न्यूज' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com