Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Supriya Shrinate: संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सुप्रिया श्रीनेत विरोध करत नसल्याचे स्पष्ट होते. दरम्यान हा व्हिडिओ सुप्रिया श्रीनेत यांच्या १७ ऑक्टोबर 2023 ला झालेल्या पत्रकार परिषदेचा आहे.
Supriya Shrinate
Supriya ShrinateEsakal

Created By: The Quint

Translated By : Sakal Digital Team

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत वेगवेगळ्या पूजेच्या वस्तू दाखवत आहेत आणि त्या एकामागून एक सांगत आहेत की, त्यावर जीएसटी लागू नाही.

दावा: 2024 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान व्हिडिओ शेअर केला जात आहे आणि असा दावा केला जात आहे की काँग्रेसने पूजा साहित्यावर जीएसटी सूट देण्यास विरोध केला होता.

'इन्स्टाग्रामवरी'वरील (Facebook) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Misleading Post About Supriya Shrinate
Misleading Post About Supriya Shrinate

सत्य : सोशल मीडियावर केला जात असलेला दावा खरा नाही. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर सुप्रिया श्रीनेत विरोध करत नसल्याचे स्पष्ट होते. दरम्यान हा व्हिडिओ सुप्रिया श्रीनेत यांच्या १७ ऑक्टोबर 2023 ला झालेल्या पत्रकार परिषदेचा आहे.

संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर हे स्पष्ट होते की, सुप्रिया श्रीनेत गंगाजलवर जीएसटी लादण्यास विरोध करत होत्या.

पत्रकारांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, सरकारने आधी कर लादला आणि नंतर काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर हा कर हटवला.

क्विंट या संकेतस्थळाने जेव्हा YouTube वर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींशी संबंधित काही कीवर्ड शोधले तेव्हा त्यांना सुप्रिया श्रीनेत यांचा हा संपूर्ण व्हिडिओ सापडला, जो 17 ऑक्टोबर रोजी काँग्रेसच्या अधिकृत चॅनेलवर शेअर केला गेला होता.

व्हायरल झालेल्या व्हिडिओशी व्हिडिओच्या व्हिज्युअलची तुलना केल्यास हे स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ त्याचाच एक भाग आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओशी या व्हिडिओच्या व्हिज्युअलची तुलना केल्यास हे स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ त्याचाच एक भाग आहे.

Supriya Shrinate
Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओमध्ये 3:05 मिनिटांनी, सुप्रिया श्रीनेत एक प्रिंट आउट दाखवत म्हणतात, "सत्य दाखवण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. खोटे बोलणाऱ्याला खूप कष्ट करावे लागतात, तरीही खोट्याचा पराभव होतो. हे 18 ऑगस्टचे इंडिया पोस्टचे ट्विट आहे, ज्यात स्पष्टपणे सांगितले आहे की, तुम्हाला 30 + 18% GST वर तुम्हाला गंगाजलाची 250 मिली बाटली मिळेल. ज्या दिवशी आमच्या राष्ट्रपतींनी हा मुद्दा उपस्थित केला आणि भाजपचे लोक खोटे बोलले. ही त्या दिवशीची इंडिया पोस्टची पे ऑर्डर आहे, या बाटलीची किंमत ३० रुपये आहे आणि त्यावर १८% जीएसटी आहे, असा स्पष्ट उल्लेख आहे.

Supriya Shrinate
Fact Check : कोरोना लसीसंदर्भातील बातम्यांमुळे लस प्रमाणपत्रात बदल करण्यात आले नाहीत; व्हायरल होत असलेला दावा चुकीचा

निष्कर्ष:

हे स्पष्ट आहे की सुप्रिया श्रीनेत यांचा अपूर्ण व्हिडीओ हा चुकीच्या संदर्भासह व्हायरल झाला असून, पुजेच्या साहित्यावर कर न लावल्याने काँग्रेस नाराज असल्याचा खोटा दावा करत आहे. वास्तविकता अशी आहे की, या संपूर्ण व्हिडिओमध्ये सुप्रिया श्रीनाटे गंगा पाण्यावर कर लादण्यास विरोध करत आहेत.

'द क्विंट' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com