
Created By : BOOM
Translated By: Sakal Digital Team
दावा
एका अमेरिकन संस्थेने अयोध्येच्या राम मंदिरासाठी 11 मूर्ती आणि सोन्याचे सिंहासन दान केल्याचे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे.
वस्तुस्थिती
BOOM ला त्याच्या तपासात असे आढळून आले की व्हायरल झालेला व्हिडिओ 'NRI वासवी असोसिएशन' या अमेरिकन संस्थेचा आहे, ज्याने तेलंगणातील भद्राचलम येथील श्री रामचंद्र स्वामी मंदिराला 12 सोन्याच्या मूर्ती दान केल्या आहेत.
एका अमेरिकन संस्थेने अयोध्येतील राम मंदिराला 11 सोन्याच्या मूर्ती आणि सिंहासन भेट दिले आहे. असा दावा करत असलेल्या सोन्याच्या सिंहासनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
BOOM या फॅक्ट चेक करणाऱ्या संस्थेच्या तपासात असे आढळून आले की व्हायरल व्हिडिओ मार्च 2023 चा आहे. सोन्याच्या मूर्ती 'NRI वासवी असोसिएशन' या अमेरिकन संस्थेने तेलंगणातील भद्राचलम येथील श्री रामचंद्र स्वामी मंदिराला दान केल्या आहेत.
फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने लिहिले की, 'अयोध्येतील श्री रामाला अमेरिकेकडून 11 मूर्ती आणि शुद्ध सोन्याचे सिंहासन भेट देण्यात आले आहे.'