Fact Check : कोटामध्ये जीव दिलेली ही मुलगी नव्हेच; व्हायरल होतोय चुकीचा फोटो, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Kota suicide case kriti viral photo : सोशल मीडियावर एक मुलीचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की तिने कोटा येथे आत्महत्या केली आहे. या फोटोमागील सत्य काय आहे जाणून घेऊया.
kota suicide kriti viral photo
kota suicide kriti viral photoesakal
Updated on: 

Created By : Aaj Tak

Translated By: Sakal Digital Team

सोशल मीडियावर एका मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोसह दावा केला जात आहे की, या मुलीचे नाव क्रिती त्रिपाठी असून तिने राजस्थानमधील कोटा येथे आत्महत्या केली आहे. या पोस्टमध्ये असेही म्हटले आहे की, तिच्या सुसाईड नोटमध्ये भारत सरकारला कोचिंग संस्था बंद करण्याचे आवाहन केले गेले होते. व्हायरल फोटोसोबत विविध भावनिक स्टोरी शेअर केल्या जात आहेत.

पोस्टमधील दावा कोणता?

फोटोत दिसणाऱ्या मुलीचे नाव क्रिती आहे. तिने राजस्थानमधील कोटा येथे आत्महत्या केली आहे. सुसाईड नोटमध्ये तिने कोचिंग संस्था बंद करण्याची मागणी केली होती. तिला ॲस्ट्रो फिजिक्स आणि क्वांटम फिजिक्समध्ये रस होता, परंतु पालकांनी तिच्यावर डॉक्टर बनण्यासाठी दबाव टाकला होता. भिवानी हलचल आणि  ibc24 सारख्या काही मीडिया संस्थांनी कोटा येथे विद्यार्थिनी क्रितीने आत्महत्या केल्याच्या बातमीसह हा फोटो देखील पोस्ट केला आहे.

पोस्टचे archieve इथे पाहा.

esakal

तथ्य पडताळणीत काय आढळले?

पुरावा 1

व्हायरल पोस्टवर प्रतिक्रिया देताना काही लोक ही वेगळी मुलगी असल्याचे लिहित असल्याचे दिसले. व्हायरल फोटोशी संबंधित इंस्टाग्राम अकाउंट "@tissa_vaasi.06" तपासले असता, त्यावर प्रतिक्रिया देताना अकाउंटधारकाने लिहिले, "पण दीदी, मी जिवंत आहे, तू माझा फोटो का काढलास?" यावरून स्पष्ट झाले की, स्क्रीनशॉटमधून व्हायरल फोटोतील मुलगी जिवंत आहे.

पुरावा 2

तपासादरम्यान "@tissa_vaasi.06" हे इंस्टाग्राम अकाउंट हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथील सोशल मीडिया इंफ्लुएंसर ज्योती ठाकूर यांचा असल्याचे समजले. या अकाउंटवरील फोटोंमध्ये व्हायरल फोटो देखील समाविष्ट होता, जो धर्मशालामध्ये काढलेला आहे.

पुरावा 3

ज्योती ठाकूरचे बंधू संजय ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, "फोटोत दिसणारी मुलगी माझी बहीण ज्योती आहे. ती कधीच कोटा येथे गेली नाही, आणि कोटा येथे तिचे शिक्षणही झालेले नाही."

पुरावा 4

BBC च्या 2016 च्या रिपोर्टनुसार, क्रिती त्रिपाठी नावाच्या मुलीने 28 एप्रिल 2016 रोजी राजस्थानमधील कोटा येथे आत्महत्या केली होती. तिच्या सुसाईड नोटमध्ये भारत सरकारला कोचिंग संस्था बंद करण्याची विनंती केली होती. परंतु आत्महत्या केलेली क्रितीचा आणि व्हायरल फोटोतील मुलगी दोन वेगवेगळ्या व्यक्ति आहेत.

निष्कर्ष

व्हायरल फोटोतील मुलगी ज्योती ठाकूर आहे, जी सुरक्षित आहे आणि हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे राहते. 2016 मध्ये कोटा येथे आत्महत्या केलेली मुलगी क्रिती त्रिपाठी होती, परंतु तिचा आणि व्हायरल फोटोतील मुलीचा काहीही संबंध नाही. सोशल मिडियावर चुकीचा मिसलिड करणारा फोटो पसरवला जात आहे.

(Aaj Tak या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com