Created By: Logically Facts
Translated by: Sakal Digital Team
मुंबई : गेल्या काही काळापासून बांगलादेशात हिंदूंवर कशा प्रकारे अन्याय होतो आहे, बांगलादेशात कसा हिंसाचार पसरला आहे याबाबतचे अनेक दावे व्हायरल होत आहेत. आताही असाच एक मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये बांगलादेशात हिंदूंवर असा अत्याचार होतो आहे हे सांगणारे दावे केले जात आहे. फॅक्ट चेकच्या माध्यमातून यामागील नेमके सत्य काय हे जाणून घेऊया.
बांगलादेशातील गिरीपूर आणि मैमनसिंग येथे स्थानिक जमातीतील सदस्यांनी हिंदू कुटुंबांवर हल्ले केल्याच्या दाव्यासह एक महिला आणि तीन मुलांचे मृतदेह दर्शविणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
एका X युजरने व्हिडिओ पोस्ट करत लिहिले आहे की, 'गिरीपूर, मैमनसिंग, बांगलादेशमध्ये, जिहादींनी हिंदू भागातील घरांवर घरोघरी हल्ला केला, काही घरांमध्ये हिंदू महिला आणि मुलांवर बलात्कार केला आणि त्यांना ठार मारले.' हाच दावा फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे.
(या व्हिडिओमधील कन्टेन्ट हा विचलित करणारा असल्याने 'लॉजिकली फॅक्ट' ने याची लिंक किंवा संग्रहित लिंक इथे दिलेली नाही.)