Fact Check: पाकिस्तानी पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यात गायत्री मंत्र पठण? वाचा काय आहे सत्य

Gayatri Mantra In Pakistan: यावेळी व्हिडिओबाबत असा दावा केला जात आहे की, पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या शपथविधी सोहळ्यात गायत्री मंत्र पठण करण्यात आले.
Fact Check Gayatri Mantra at the swearing in ceremony of Pakistani PM.
Fact Check Gayatri Mantra at the swearing in ceremony of Pakistani PM.Esakal

Gayatri Mantra at the swearing in ceremony of Pakistani PM:

सोशल मीडियावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीत एक महिला गायत्री मंत्र पठण करताना दाखविणारा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यावेळी व्हिडिओबाबत असा दावा केला जात आहे की, पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या शपथविधी सोहळ्यात गायत्री मंत्र पठण करण्यात आले.

मात्र, या व्हिडिओबाबत आम्ही अधिक माहिती घेतल्यानंतर आढळले की, हा व्हिडिओ शेहबाज शरीफ यांच्या शपथविधी सोहळ्यातील नसून, 2017 मध्ये पाकिस्तानमध्ये झालेल्या होळी उत्सवाचा आहे.

दावा

व्हिडिओमध्ये दिसत आहे की, नवाझ शरीफ यांच्यासमोर एक महिला स्टेजवर गायत्री मंत्राचे पठण करत आहे.

"पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा शपथविधी समारंभात श्रीमती नरोदा मालिनी साहिबा यांच्या "गायत्री महा मंत्र" ने सुरू होत आहे. आता पाकिस्तानने अधिकृतपणे "गायत्री महा मंत्र"चे महत्त्व ओळखले आहे आणि सर्व कार्यक्रमांमध्ये त्याचे पठण केले जात आहे," अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

Fact Check Gayatri Mantra at the swearing in ceremony of Pakistani PM.
Fact Check: "पुढील आयुष्यात मुस्लिम म्हणून जन्म घ्यायचा आहे," कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही संबंधित व्हिडिओचे मूळ शोधले. तेव्हा इंटरनेटवर आम्हाला 2017 मधील अशा अनेक बातम्या आणि व्हिडिओ सापडले.

ज्यामध्ये स्पष्ट दिसत होते की, हा व्हिडिओ 2017 मध्ये पाकिस्तानात झालेल्या होळीच्या कार्यक्रमातील होता.

Fact Check Gayatri Mantra at the swearing in ceremony of Pakistani PM.
Fact Check: धोनीने खरंच शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला? वाचा, व्हायरल फोटोमागील सत्य

तुम्हीही करू शकता फॅक्ट चेक

जर तुम्हालाही सोशल मीडियावरील एखाद्या मेसेज, पोस्ट किंवा व्हिडिओबाबत शंका येत असेल, तर तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी PIB कडून त्याबाबतची सत्य परिस्थिती तपासू शकता.

यासाठी तुम्हाला PIB च्या अधिकृत वेबसाइट https://factcheck.pib.gov.in/ ला भेट द्यावी लागेल.

याशिवाय, तुम्ही WhatsApp क्रमांक +918799711259 किंवा pibfactcheck@gmail.com या ईमेल आयडीवर मेसेज किंवा व्हिडिओ पाठवून फॅक्ट चेक करू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com