Fact Check : दिल्लीतील बसमध्ये मुलीची छेडछाड? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य जाणून घ्या

Fact Check Viral scripted video of girl harassment : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात दिल्लीतील बसमध्ये मुलीच्या छेडछाडीचा दावा केला जात आहे. या व्हिडिओ मागील सत्य जाणून घेऊया.
Viral scripted video of girl harassment shared on social media, causing misinformation and public confusion
Viral scripted video of girl harassment shared on social media, causing misinformation and public confusionesakal
Updated on: 

Created By : PTI News

Translated By: Sakal Digital Team

सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दिल्लीतील बसमध्ये काही युवक एका मुलीशी छेडछाड करताना दिसत आहेत. यामुळे युजर्सनी ती घटना खरी असल्याचा दावा करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

व्हायरल पोस्टमधील दावा

दिल्लीच्या एका बसमध्ये मुलीसोबत छेडछाड झाली असून, संबंधित आरोपींना लवकरात लवकर शोधून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Viral video of delhi girl bus harassment
Viral video of delhi girl bus harassmentesakal

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स ( पूर्वीचे टि्वटर) केआरके उर्फ ​​कमाल खान ने १८ डिसेंबर रोजी एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात लिहिले आहे की, “मी ईश्वराचा आभारी आहे की माझ्या मुलांमध्ये गुन्हेगारी वृत्ती राहत नाही!@DCPSouthDelhi @Delhiपोलिस सरकारच्या विरोधात असणाऱ्या शिक्षित लोकांना अटक करू शकतात परंतु या गुन्हेगारांना नाही.

पोस्टचे Archieve इथे आणि इथे पाहा.

दुसऱ्या एका युजरने भाजप आणि आम आदमी पार्टीला टॅग करून लिहिले, "दिल्लीतील या राक्षसांना लवकरात लवकर शोधा."

पोस्टचे Archieve इथे पाहा.

Viral video of delhi girl bus harassment
Viral video of delhi girl bus harassmentesakal

तथ्य पडताळणी

पुरावा 1

व्हायरल व्हिडिओचे 'की-फ्रेम्स' रिव्हर्स सर्च केल्यावर अमन बेनीवाल या यूट्यूब क्रिएटरचा मूळ व्हिडिओ सापडला. हा व्हिडिओ 23 फेब्रुवारी 2023 रोजी यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता.

Viral video of delhi girl bus harassment
Viral video of delhi girl bus harassmentesakal

पुरावा 2

व्हिडिओच्या 27व्या सेकंदावर एक डिस्क्लेमर दिसतो, ज्यामध्ये स्पष्ट लिहिले आहे की, "हा व्हिडिओ फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवलेला आहे. याचा वास्तविकतेशी काहीही संबंध नाही."

Viral video of delhi girl bus harassment
Viral video of delhi girl bus harassmentesakal
Viral video of delhi girl bus harassment
Viral video of delhi girl bus harassmentesakal

पुरावा 3

अमन बेनीवाल यांच्या इतर प्रॅंक व्हिडिओंची तपासणी केल्यावर असे आढळले की, ते मनोरंजनासाठी प्रॅंक व्हिडिओ तयार करतात आणि फेसबुकवर त्यांनी स्वतःला 'डिजिटल क्रिएटर' म्हणून ओळख दिली आहे.

Viral video of delhi girl bus harassment
Viral video of delhi girl bus harassmentesakal

निष्कर्ष

व्हायरल व्हिडिओ खरा नाही. तो स्क्रिप्टेड असून, केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला गेला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जात आहे.

(PTI News या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com