Created By : Aaj Tak
Translated By: Sakal Digital Team
सोशल मीडियावर रणवीर अलाहाबादियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो रडत म्हणत आहे की त्याला पश्चात्ताप होत आहे कारण त्याच्या मुळे संपूर्ण काम बंद झाले आहे. व्हिडीओमध्ये तो पुढे म्हणतो की संपूर्ण टीमला याचा फटका बसत आहे. तसेच, या व्हिडीओमध्ये तो शिवीगाळ करतानाही दिसत आहे.
आजतक फॅक्ट चेकने हे सत्य तपासले आणि आढळले की हा व्हिडीओ 2021 चा आहे, जेव्हा रणवीरला कोविड झाला होता.
यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणी वाढत आहेत. समय रैना यांच्या शो ‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्याच्या विरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. केवळ त्याच्यावरच नाही, तर समय रैना, इन्फ्लुएंसर अपूर्वा मखीजा आणि अनेक इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.