
Created By : Boom Live
Translated By: Sakal Digital Team
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजप खासदार कंगना रनौत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दोघेही एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.
बूम फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की हा व्हिडिओ एआयच्या मदतीने एडिट करण्यात आला आहे.
फेसबुकवर शेअर करताना एका युजरने लिहिले की, 'ते दिवस गेले जेव्हा प्रेम हा जीवन आणि मृत्यूचा प्रश्न होता, आता जर कोणी एखाद्यापासून वेगळे झाले तर तो मरत नाही!!' गुरु- ओ- गुरु... आता आपण विश्वगुरू आहोत.' ( हिंदीतून अनुवादित).पोस्टची आर्काइव्ह लिंक येथे पाहा.