
सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, प्रधानमंत्री फ्री रिचार्ज योजनेंतर्गत सर्व भारतीय यूजर्सना ३ महिन्यांचे मोफत मोबाईल रिचार्ज मिळत आहे. हे रिचार्ज ३० डिसेंबरपूर्वी करा. पोस्टसोबत एक लिंकही शेअर करण्यात आली आहे. ज्यावर क्लिक करून तुम्ही ८४ दिवसांचे फ्री रिचार्ज मिळवू शकता. मात्र या प्रकरणाची आता विश्वास न्यूजनं पडताळणी केली आहे. या पडताळणीत वेगळंच सत्य समोर आले आहे.