
Created By : Boom Live Fact check
Translated By: Sakal Digital Team
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीतील निगम बोध घाटावर राजकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात ठेवण्यात आले होते. दरम्यान, मनमोहन सिंग यांच्या अंत्ययात्रेला काँग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता, असा दावा सोशल मीडियावर काही लोकांनी केला आहे.