Fact Check: काँग्रेसच्या रॅलीतील झेंडे पाकिस्तानचे नाहीत, खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहेत जुने व्हिडिओ

Pakistan Flag In Congress Rally: सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अशात मोठ्या प्रमाणात खोटे तसेच छेडछाड केलेले अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Indian Union Muslim League Flag And Pakistan Flag
Indian Union Muslim League Flag And Pakistan FlagEsakal

Fact Check On Pakistan Flag In Congress Rally In Kerala:

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. अशात मोठ्या प्रमाणात खोटे तसेच छेडछाड केलेले अनेक फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारफेरीमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले असल्याचा दावा करण्यात येत आहे.

काय आहे दावा?

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर @sunnyrajbjp या अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

या युजरने व्हिडिओसह असे लिहिले आहे की, "हा पाकिस्तानमधील नाही तर केरळमधील काँग्रेस उमेदवार के. मुरलीधरन यांचा निवडणूक प्रचार आहे. व्हिडिओमध्ये एखादा तरी भारतीय ध्वज दिसत आहे का? काँग्रेसला मतदान करण्यापूर्वी नीट विचार करा."

False Claim
False ClaimEsakal
Indian Union Muslim League Flag And Pakistan Flag
Lok Sabha Election 2024: भाजपने काँग्रेसचा खिसा कापला? निवडणूक रोख्यांमधून कमावले अन् विरोधकांचे गोठवले

काय आहे सत्य?

या व्हिडिओबाबत शंका आल्यानंतर आम्ही या पोस्टबाबत सत्य तपासले. यामध्ये आम्हाला आढळले की, व्हिडिओमध्ये फडकवले जाणारे झेंडे पाकिस्तानचे नसून ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’ या राजकीय पक्षाचे असल्याचे आहेत. तसेच हा व्हिडिओ 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या काळातील आहे.

इंडियन युनियन मुस्लिम लीग हा प्रामुख्याने केरळमधील राजकीय पक्ष आहे. भारताच्या निवडणूक आयोगाने केरळमध्ये या पक्षाला राज्य पक्ष म्हणून मान्यता दिली आहे

Indian Union Muslim League Flag And Pakistan Flag
Kolhapur Loksabha : उद्धव ठाकरे आज शाहू महाराजांच्या भेटीला; नवीन राजवाड्यात होणार रणनीतीवर चर्चा
Difference Between Indian Union Muslim League Flag And Pakistan Flag
Difference Between Indian Union Muslim League Flag And Pakistan FlagEsakal

वरील फोटोमध्ये डाव्या बाजूचा झेंडा पाकिस्तानचा आहे. तर उजव्या बाजूचा फोटो “इंडियन युनियन मुस्लिम लीग”चा आहे. जो व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ खोटा असल्याचे आणखी एखा पद्धतीने ओळखू शकता. तुम्ही पाकिस्तान आणि “इंडियन युनियन मुस्लिम लीग”चे झेंडे पाहिले तर लक्षात येईल की, पाकिस्तानच्या झेंड्यातील चंद्र आणि ताऱ्याचा आकार खूप मोठा आणि मध्यभागी आहे. याशिवाय यात पांढरा पट्टाही आहे.

पण व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या ध्वजांवर फक्त चंद्र आणि तारा छापलेला आहे. जो “इंडियन युनियन मुस्लिम लीग”चा आहे.

केरळमध्ये, IUML काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीचा भाग आहे. त्यामुळे काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात त्यांचे झेंडे होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com