Fact Check : बांगलादेशमध्ये साधूचे केस कापून जबरदस्तीने मुस्लिम बनविले नाही, चुकीचा दावा व्हायरल

Viral video : काही यूजर्सनी हा व्हिडिओ शेअर केला असून ते दावा करत आहेत की, हा व्हिडिओ बांगलादेशातील एका साधूला केस कापून जबरदस्तीने मुस्लिम बनवले जात आहे.
Fact Check : बांगलादेशमध्ये साधूचे केस कापून जबरदस्तीने मुस्लिम बनविले नाही, चुकीचा दावा व्हायरल
Updated on: 

Created By : Vishvas News

Translated By: Sakal Digital Team

मुंबई : बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचारांचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुण एका व्यक्तीला पकडून त्याचे केस कापताना दिसत आहेत. काही यूजर्सनी हा व्हिडिओ केला असून ते दावा करत आहेत की, हा व्हिडिओ बांगलादेशातील एका साधूचे केस कापून त्याला जबरदस्तीने मुस्लिम बनवले जात आहे.

विश्वास न्यूजच्या तपासात समोर आले आहे की, हा व्हिडिओ धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी शेअर केला जात आहे. प्रत्यक्षात बाजारात रस्त्यावर भटकणाऱ्या एका निराधार मुस्लिम व्यक्तीला काही तरुणांनी स्वच्छ करून आंघोळ घातली होती. पण साधूला जबरदस्तीने मुस्लिम बनवल्याचा खोटा दावा करून तो व्हिडिओ व्हायरल केला जात आहे. दरम्यान संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी हिंदू आणि अल्पसंख्यांकांवरील हिंसाचाराचा मुद्दा बांगलादेश सरकारसमोर मांडला असून सरकार त्यावर लक्ष ठेवून आहे, असे म्हटले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com