Teacher Cruel Punishment : धक्कादायक! बेचा पाढा आला नाही म्हणून शिक्षकाने ९ वर्षाच्या चिमुकल्यावर चालवले ड्रिल मशीन

शिक्षकाने लहानग्याच्या हातावर चक्क ड्रिल मशिनने पाडले छिद्र
Teacher Cruel Punishment
Teacher Cruel Punishmentesakal

Teacher Cruel Punishment : 5 वी मध्ये शिकणाऱ्या एका मुलाला आपल्या शिक्षकाने बेचा पाढा म्हणायला सांगितला, पण त्याला तो म्हणता आला नाही; तसं म्हटल तर 5वीच्या मुलाला बेचा पाढा हा येणं अपेक्षित आहे पण त्याला ते जमले नाही.

साधारण प्रकारांमध्ये शिक्षकांनी त्याला काय शिक्षा दिली असती, की उद्या १० वेळेस हा पाढा लिहून आण किंवा बाकावर उभ राहून पाढा पाठ कर, किंवा समोर बसवून तो पाढा पाठ होई पर्यंत लिहायला लावला असता. पण हा प्रकार बघून धडकीच भरते. उत्तर प्रदेशमधल्या कानपूर शहरात एका प्रायव्हेट शाळेतील शिक्षकाने बेचा पाढा म्हणता आला नाही म्हणून ९ वर्षाच्या लहानग्याच्या हातावर चक्क ड्रिल मशिनने छिद्र पाडले.

Teacher Cruel Punishment
CHB Teachers : तासिका शिक्षकांच्या मानधनात वाढ!

हा विद्यार्थी सिसामाऊ इथला रहिवासी आहे, त्याने पोलिसांना दिलेल्या एफ आय आर मध्ये लिहिल्या प्रमाणे, "माझ्या शिक्षकांनी मला बेचा पाढा म्हणायला लावला, पण मला तो म्हणता आला नाही, सर चिडले आणि माझ्या डाव्या हाताला ड्रिल करू लागले, माझ्या बाजूच्या मुलाने पटकन त्या मशीनची वायर काढून टाकली"

Teacher Cruel Punishment
Satara Teacher Bank Election : तू शेर, तो मैं सव्वाशेर

या घटनेनंतर मुलाला शाळेतून घरी पाठवण्यात आले आणि त्याच्यावरती उपचार करण्यात आले. दरम्यान सगळीकडे चिंतेच वातावरण पसरलं आहे, पालकही घाबरले आहेत. पोलिसांनी दक्षता घेत त्या लहानग्याच नाव उघडकीस न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Teacher Cruel Punishment
Rava Batata Puri Recipe : पुरी खायला आवडते? पण कधी रवा बटाटा पुरी ट्राय केली आहे का?

या घटनेबद्दल बोलताना कानपूर नगरचे मूलभूत शिक्षा अधिकारी, सुजित कुमार सिंग म्हणाले, "या संपूर्ण घटनेच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रेम नगर आणि शास्त्री नगरचे ब्लॉक शिक्षण अधिकारी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठवतील.

Teacher Cruel Punishment
Health Benefit of Figs: अंजीर खाण्याचे आरोग्यासाठी फायदे

कोणीही दोषी आढळल्यास त्याला दंडात्मक कारवाईला सामोरे जाव लागेल" ANI ने या प्रकरणाशी संबंधित लोकांशी बोलून ही माहिती ट्विटरवर शेअर केली. कानपूर जिल्ह्यातील प्रेमनगर येथील उच्च प्राथमिक शाळेमधील घटना आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com