'राजे साहेबांचे काय चुकलं होत?'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

टीम ई-सकाळ
Saturday, 14 September 2019

उदयनराजे भोसले आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन आज (शनिवार) भाजपमध्ये प्रवेश करतील. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भावनिक पोस्ट टाकून त्यांना आवाहन केले जात आहे. 

पुणे : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता उदयनराजेंच्या या निर्णयावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया येत आहेत. 'महाराज निर्णय चुकलाच.....गादीसोबत आहोत परंतु पक्षासोबत नाही.......'

उदयनराजे भोसले आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन आज (शनिवार) भाजपमध्ये प्रवेश करतील. मात्र, त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भावनिक पोस्ट टाकून त्यांना आवाहन केले जात आहे. 

#महाराज निर्णय चुकलाच......
गादीसोबत आहोत परंतु पक्षासोबत नाही.......
चौकीदार म्हणणाऱ्या पक्षाच्या यादीत छत्रपती शोभून दिसणारे नाही.

राजे ते लोक कधीच आपल्या विचारांचे नव्हते, तुम्ही अजूनही विचार करायला हवा, आमच्यासारख्या मावळ्यांना अजूनही भाबडी अशा आहे...
आम्हाला कळते असं #साहेबांनी त्यांच्या परीने जेवढे जमेल तेवढ तुमच्यावर प्रेम केलं...
*तुमची वेगळी जागा आहे आणि ती राहणार.*

i miss u महाराज
आज पण तुम्ही आमच्या मनात राजे, पण राजकारण म्हटलं की फ़क्त पवार साहेबच....क्षमा असावी राजे! 
जय भवानी जय शिवजी!!!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udyanraje Bhosale enters BJP today videos viral on social media