Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 September 2019

मार्क ओफुआ असं या स्नेकमॅनचं नाव असून, याच्याकडे जवळपास 30 वेगवेगळ्या जातीचे साप आहेत. सापांसोबत बबुन माकड, कासव, कुत्रा असे अनेक प्राणीही हा स्नेकमॅन पाळतो.

​सापांना पकडून सुखरुप ठिकाणी सोडणारा हा स्नेकमॅन तुम्ही पाहिलाय का? हा कुठे साप अडकला असेल तर त्याची सुटका करून त्याला घरी आणतो आणि मग त्यावर उपचार करून त्याला जंगलात सुखरुप सुटका करतो. 

मार्क ओफुआ असं या स्नेकमॅनचं नाव असून, याच्याकडे जवळपास 30 वेगवेगळ्या जातीचे साप आहेत. सापांसोबत बबुन माकड, कासव, कुत्रा असे अनेक प्राणीही हा स्नेकमॅन पाळतो.

दिवसभर याचं कामच हे असतं. सकाळी उठल्यावर प्राणी, सर्प कुठे संकटात आहेत का ते शोधून त्यांची सुटका करणं. साप जखमी झाल्यास त्यावर उपचार करून त्याचा सांभाळ कऱणं असं काम हा स्नेकमॅन करत असतो. त्यामुळं या स्नेकमॅनचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. हा सगळा प्रकार नायजेरीयाच्या लागोसमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळं तुम्हाला जखमी अवस्थेत साप, प्राणी दिसला तर त्यांना मारू नका, त्यांना परत जंगलात सोडून जीवदान द्या.

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya Snakeman