Viral Story : इमानदार चोर; लॅपटॉप चोरला आणि महत्त्वाच्या फाईल मालकाला मेलने पाठवल्या

सध्या सोशल मीडियावर एका चोराची चर्चा जोरात सुरू
Viral Story news
Viral Story newsesakal

Viral Story : चोरीच्या अनेक कथा तुम्ही वाचल्या आणि ऐकल्या असतील. पण चोरीनंतर चोराने माफी मागितल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? ही ई-मेलद्वारे नाही ना? हे क्वचितच ऐकायला मिळते. पण सध्या सोशल मीडियावर अशाच एका चोराची चर्चा जोरात सुरू आहे. लॅपटॉप चोरल्यानंतर या चोराने त्याच्या मालकाची माफी मागणारा ईमेल पाठवला आहे. ज्यात चोराने लिहिले आहे की, तो केवळ पैशाच्या हव्यासापोटी हे सर्व करत आहे. लॅपटॉप मालकाने ट्विटरवर ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे, जो व्हायरल झाला आहे.

Viral Story news
Viral Love Story: तरुणाने केला आज्जीबाईंशी साखरपुडा, दहा वर्षांचा असतानाच झालेलं वेडं प्रेम

चोराने केलेल्या मेलमध्ये 'कसा आहे मित्रा.? मला पैशाची गरज होती. माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी खूप धडपडत होतो.त्यामुळे मी काल तुझा लॅपटॉप चोरला. त्याबद्दल मला माफ कर.असे म्हटले आहे. चोराने लॅपटॉपच्या मालकाला काही महत्त्वाचे फाइल्सही पाठवले आहेत. त्यावर तो असा म्हणतोय की, ‘मी पाहिले की तुम्ही एका रिसर्चवर काम करत आहात. ती फाईल मी या ई-मेल सोबत जोडली आहे.तुम्हाला दुसरी फाईल हवी असल्यास मला सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या आत मेल करा. कारण मला लॅपटॉप खरेदी करणारा व्यक्ती भेटला असून मी तो विकणार आहे.

Viral Story news
Viral Photo Story: "शाळा बंद झाली तर मला सुद्धा ऊस तोडायला.. "

ट्विटरवर ई-मेलचा स्क्रीनशॉट शेअर करत या लॅपटॉप मालकाने लिहिले आहे. ‘हा ई-मेल वाचल्यानंतर माझ्या मनात अनेक विचार येत आहेत’ असे कॅप्शन त्याने दिले आहे. लॅपटॉप मालकाच्या ई-मेलचा वापर करून चोरट्याने लॅपटॉप चोरी करण्यासोबतच काही महत्त्वाच्या फाईल्स त्याच्याकडे पाठवण्याची आपली मजबुरी सांगितली.

Viral Story news
Viral Photo Story: बोबड्या बोलात ६ वीच्या विद्यार्थ्यांचं मुख्यमंत्री शिंदेंना भावनिक पत्र

या पोस्टला आतापर्यंत 2.4 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. तर सुमारे 30 हजार लोकांनी रिट्विट केले आहे. यामध्ये काही नेटीझन्सनी त्या चोराला नोकरी द्यावी, तर काहींनी लॅपटॉपच्या बदली त्याला पैसे ऑफर करा, असा सल्ला लॅपटॉप मालकाला दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com