sakal fact checkEsakal
व्हायरल-सत्य
Fact Check: पोलीस आणि जमावातील चकमकीचा तो व्हिडिओ दिल्लीचा नव्हे, गुजरातचा; जाणून घ्या व्हायरल व्हिडिओमागील सत्य
Viral video of police clash: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी दिसत असून काही पोलिस नागरिकांवर लाठीमार करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ दिल्लीतील असल्याचा दावा काही सोशल मीडिया युजरने केला आहे मात्र, सत्य वेगळे आहे. जाणून घेऊया काय ते..
Created By : Aaj Tak
Translated By: Sakal Digital Team
नवी दिल्ली: पोलिस ठाण्यासमोर चेंगराचेंगरी आणि आरडाओरडा करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये काही पोलिस लोकांवर लाठीमार करताना दिसत आहेत. याशिवाय सिव्हिल ड्रेसमध्ये असणाऱ्या या लोकांच्या हातात काठ्याही दिसत आहेत. काही सोशल मीडिया यूजर्स ही दिल्लीतील घटना असल्याचे सांगत आहेत.
दावा काय आहे..?
इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर लिहिले आहे की 'आज सकाळी दिल्लीमध्ये सर्वात मोठी दुर्घटना घडली. त्यावर 27 जानेवारी 2025 ही तारीखही लिहिली आहे. या पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.
sakal fact checkEsakal
