#SaathChal वारीनिमित्त साडे तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त 

पाडुरंग सरोदे
Thursday, 5 July 2018

पुणे : संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यासाठी तब्बल साडे तीन हजार पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. आठ पोलिस उपायुक्तांसह शहर पोलिसांची विविध पथकांवरही वारीच्या बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे. पालखीच्या शहरातील आगमनापासून ते प्रस्थानापर्यंतचा चोख बंदोबस्त पोलिसांनी केला आहे. 

संत ज्ञानेश्‍वर महाराज पालखी शुक्रवारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवणार आहे. तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे गुरुवारी देहू येथून प्रस्थान झाले आहे. दोन्ही पालखी रथ व दिंड्यांचे शनिवारी शहरात आगमन होत आहे. शनिवारी व रविवारी पालखी पुण्यात मुक्कामी असणार आहे. त्यादृष्टीने शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यावर भर दिला आहे. पोलिस उपायुक्त (विशेष शाखा, 1) संजय बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पालखीच्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य राखीव पोलिस दल, गुन्हे प्रतिबंधक पथक, बॉम्बशोधक व नाशक पथक, शीघ्र कृती दल यांसारखी पथके बंदोबस्तामध्ये असणार आहे. 

पोलिस उपायुक्त - 8 
सहाय्यक पोलिस आयुक्त - 15 
पोलिस निरीक्षक - 75 
सहाय्यक व उपनिरीक्षक - 184 
पोलिस कर्मचारी - 1830 

 साध्या वेशातील पोलिस 
पोलिस उपायुक्त -1 
सहायक आयुक्त - 2 
पोलिस निरीक्षक - 6 
सहायक व उपनिरीक्षक - 11 
पोलिस कर्मचारी - 75 

वाहतूक पोलिस 
पोलिस उपायुक्त - 1 
सहाय्यक पोलिस आयुक्त - 3 
पोलिस निरीक्षक - 29 
पोलिस उपनिरीक्षक - 40 उपनिरीक्षक 
पोलिस कर्मचारी - 1 हजार 

होमगार्ड - 150 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Arrangement of 3.5 thousand police constables on Vari